संजय राऊतांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र ठाणे पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. यानंतर आता राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचले असून त्यांची हॉटेलमध्ये चौकशी करण्यात येत आहे. संजय राऊतांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा : भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा होते पाकिस्तानच्या ISI शी संपर्कात! NIA ची धक्कादायक माहिती)
राऊतांचा जबाब घेण्याचे काम सुरू
संजय राऊतांनी जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. ते सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. याप्रकरणी ठाणे पोलिसांकडून जबाब घेण्याचे काम सुरू आहे. ठाण्याचे एसीपी संजय राऊतांच्या भेटीला नाशिकला पोहोचले आहे. ठाणे पोलिसांच्या ६ जणांच्या पथकाने नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये राऊतांचा जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे.
तसेच नाशिक पोलिसांनी राऊतांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ केली आहे. मंगळवारी संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले यानंतर ते बुधवारी सिन्नरकडे जाणार आहे. संजय राऊत यांच्यासोबत ३ पोलीस कर्मचारी आणि एक वाहन सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील स्वागत कमानीच्या उद्घाटनासाठी संजय राऊत जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community