शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना सल्ले देता-देता आज थेट सर्वोच्च न्यायालयाला सुनावत एक सल्ला दिला. “इव्हीएम मशिनच्या (EVM machin) विरोधात एक मोठं आंदोलन दिल्ली (Delhi) येथे सुरु आहे. ते लोकशाही (Democracy) वाचवण्यासाठी आहे ना? पुर्ण देशात अशाप्रकारचे वातावरण आहे. हे पाहण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेही रस्त्यावर उतरले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. (Sanjay Raut)
चंडीगढ प्रकरण
चंडीगढ महापौर निवडणुकीबाबत (Chandigarh Mayor election) झालेल्या कथित गैरप्रकाराविरोधात काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. निवडणूक अधिकारी यांच्या संदर्भातील एक व्हिडीओ फुटेज पाहिल्यानंतर न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले. (Sanjay Raut)
झापन्याला आम्ही किंमत देत नाही
यासंदर्भात राऊत यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “न्यायालयाच्या झापन्याला (strictures) आम्ही फार काही किंमत देत नाही. महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रकरणातही बेकायदेशीर, घटनाबाह्य (unconstitutional) सरकाराला सर्वोच्च न्यायालयाने झापलं होतं. पण पुढं काय केलं? त्यांची झापाझापी चांगली आहे. आम्ही त्यांच्या झापाझापीचं स्वागत करतो, पण पुढं काय?” असे त्यांनी सुनावलं. (Sanjay Raut)
(हेही वाचा – Hair Colour Style For Men: व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसण्याकरिता पुरुषांनी केसांसाठी वापरावेत ‘हे’ आकर्षक रंग !)
झापण्यापलीकडली पावलं टाका
ते पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतरही विधानसभा (assembly speaker) अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar), त्यांच्या ट्रॅब्युनलनं (Tribunal) या घटनाबाह्य सरकारला (एकनाथ शिंदे सरकार) मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना किंवा सरकारला बरखास्त केलं का? संविधान (Indian constitution), घटनेतील शेड्युल १० (Schedule 10) पायदळी तुडवलं जातंय. आणि न्यायालय फक्त झापत राहतंय? या झापण्यापलीकडली पावलं टाका आता,” अशी खदखद राऊत यांनी बोलून दाखवली. (Sanjay Raut)
देशात लोकशाहीची ‘मर्डर’
पुढे एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार व्यक्त करतो की त्यांची नजर चंडीगढपर्यंत गेली. पण फक्त चंडीगढमध्येच नाही तर पुर्ण देशात लोकशाहीची ‘मर्डर’ (murder) होत आहे.” (Sanjay Raut)
(हेही वाचा – Best Cancer Hospital in Mumbai : मुंबईतील सर्वोत्तम कर्करोग रुग्णालये)
न्यायालयाचा आदर करतो
सर्वोच्च न्यायालयावर राग व्यक्त करताना राऊत यांनी बोलण्याच्या ओघात मध्ये २-३ वेळा “आम्ही न्यायालयाचा आदर करतो,” असे बोलून ‘न्यायालयाचा अवमान’ला सामोरे जावे लागू नये, याची काळजीही घेतली. (Sanjay Raut)
न्यायालायाने फासावर लटकवावं
“महाराष्ट्र, झारखंड मध्ये काय झाले? महाराष्ट्रात गेल्या एक-दिड वर्षांपासून असंविधानिक सरकार काम करत आहे. ही लोकशाहीची हत्या नाही का? सर्वोच्च न्यायालय फक्त लोकशाहीच्या हत्येवर फक्त मत व्यक्त करतं.. पण जे लोकशाहीचे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय काय करतंय? असा आम्ही जनतेच्यावतीने न्यायालयाला प्रश्न करीत आहोत,” असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community