राज्यपालांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपालांवर टीका करताना संजय राऊत यांच्या तोंडून पुन्हा शिवराळ भाषा निघाली आहे.
( हेही वाचा : ‘बायकोच्या हस्तक्षेपामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले’ मनसेच्या प्रकाश महाजनांचे टीकास्त्र)
संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली…
सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला वाटलं होतं एखादा मंत्री याविरोधात उभा राहील आणि राजीनामा देऊन महाराष्ट्रात येईल आणि शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी त्याग केला म्हणून सांगेल पण जो हा अपमान करत आहेत ते xxxx अवलाद आहेत असे बोलत संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केला.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. त्या सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ३० ते ३५ लोक सोडून गेले, आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले… त्यांना आम्ही तिकीट दिलं, ते सोडून गेले म्हणजे पक्ष गेला नाही असेही राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community