ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सध्या निवडणूक आयोगाच्या निकालावर उघड उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर तिखट प्रतिक्रिया देत आहेत. धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाव चोरले आहे, २ हजार कोटींचा सौदा करून ते विकत घेतले आहे, असा आरोप करत आहेत. त्यातच आता राऊत यांनी त्यांची नाराजी व्यक्त करताना चक्क विचारांची चोरी केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटने त्यांचा पर्दाफाश झाला आहे.
सुविचाराचं मूळ कार्ड @News18lokmat ने 18 फेब्रुवारी रोजी केले होते… पण, त्यात एडिट करून लोगो बाजुला केला गेलाय आणि ते कार्ड शेअर करण्यात आलंय. पण, विचार शेअर होणं, अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर @rautsanjay61 यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीकडून शेअर होत असेल तर आनंदच आहे. https://t.co/lOrpoVjKh0 pic.twitter.com/phZHVzC6ek
— Arjun Nalavade (@NalavadeArjuna) February 21, 2023
संजय राऊत यांनी ट्विट केले, जॉर्ज बनार्ड शॉ यांचे विचार त्यांनी ट्विट केले. त्यात सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करत नाही. पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली की ती व्यक्त सत्तेला भ्रष्ट करते, असे त्यांचे विचार संजय राऊत यांनी ट्विट केले. मात्र प्रत्यक्षात हेच विचार न्यूज १८ लोकमत ने ट्विटद्वारे केले होते. तेच ट्विट संजय राऊत यांनी न्युज १८ लोकमतचे नाव वगळून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये आता यावर राऊत यांच्या या कृतीवर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा शिंदेच्या शिवसेनेचा आनंद औटघटकेचा – संजय राऊत)
Join Our WhatsApp Community