Chitra wagh vs Sanjay Raut : स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही…, चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत

चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' वर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

113
Chitra wagh vs Sanjay Raut : स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही..., चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत
Chitra wagh vs Sanjay Raut : स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही..., चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत

सध्या देशभरात ‘पनौती’ हा शब्दावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. आता राज्यातही या शब्दवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. तर हाच शब्द वापरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पनौती’ असं वक्तव्य केलं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोस्ट करत म्हणाल्या की दुसऱ्यांसाठी पनवतीची अपेक्षा करताना स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही…? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Chitra wagh vs Sanjay Raut)

बम बम भोले आणि राऊतसाहेब बोले

चित्रा वाघ यांनी आपल्या ‘X’ वर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सर्वज्ञानी संजय राऊतजी दुसऱ्यांसाठी पनवतीची अपेक्षा करताना स्वतःची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही? बनारसला जायचं की नाही ते आम्ही ठरवूच पण तुमचा मुक्काम हल्ली बनारसच्या अस्सी घाटावरच असतो असं तुमचं नशाबाज वर्तन पाहून वाटतंय. तिथल्या फेमस बनारसी पुडीच्या धुंदीमुळे तुमचं एकदर ताळतंत्र सुटल्यासारख दिसतंय. ‘बम बम भोले आणि राऊतसाहेब बोले’, असं काही झालंय का…? काळजी घ्या. तुमचं बेताल बडबडीचं व्यसन सुटाव ही त्या काशीनरेश बाबा विश्वनाथाचरणी प्रार्थना.!” (Chitra wagh vs Sanjay Raut)

(हेही वाचा : Winter Session : नागपूरची थंडी बोचण्याआधीच परिपत्रक बोचले)

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची पनौती

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली. राजस्थानच्या येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, टीम इंडिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण या पनौती मुळे पराभव पत्करावा लागला. यानंतर हा शब्द खुप चर्चेत आला आहे. आता हा शब्द संजय राऊत यांनी शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी वापरला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची पनौती आहे ते महाराष्ट्रातही हरणार आणि बाहेरही पुढे बोलत असताना ते म्हणाले की, २०१४ ला लागलेली पनौती २०२४ ला दूर होणार आहे. अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.