काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपण लोकसभेत २३ जागांवर निवडणूक लढवणार असा दावा केला. त्यानंतर इंडी आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद सुरु झाला. ठाकरे गटाने २३ जागा लढवल्या तर आम्ही कोणत्या जागा लढवायच्या ? असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाला संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. याचवेळी राऊत यांनी देशाच्या पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी कसे योग्य आहे हे देखील सांगितले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
जागावाटपावरून उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. उद्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. त्यामुळे आमच्यात मतभेद असण्याचं काही कारणच नाही. जागा वाटपावरून प्रश्न विचारणारे संजय निरुपम कोण आहेत? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु. अशा शब्दांमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निरुपम यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. तसेच पुढे बोलतांना त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.
(हेही वाचा – Parliament Attack: संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट होणार, 2 जानेवारीपासून सुनावणी)
पंतप्रधान पदासाठी लागणारे सर्व गुण राहुल गांधींमध्ये
राहुल गांधी एक लोकप्रिय नेता आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमधून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं आहे. त्यांनी या काळात खूप संघर्ष केला आहे, आणि जनतेला संघर्ष करणारा चेहरा नेहमीच आवडतो. राहुल गांधी कधी खोटं बोलत नाहीत. ते प्रामाणिक आहेत. ते एक देशभक्त आहेत. एका देशाचं प्रधानमंत्री होण्यासाठी आणखी कोणते गुण पाहिजे ? असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर ‘हा’ नवीन विक्रम )
राहुल गांधी आगामी पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात
पंतप्रधान पदासाठी लागणारे सर्व गुण राहुल गांधींमध्ये आहेत. राहुल गांधी आगामी पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात. तसेच राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्यात गैर काय ? असे संजय राऊत म्हणाले. पुढे बोलतांना राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “राम मदिंर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणाची वाट पाहत नाही. राम मंदिर सोहळा हा भाजपचा कार्यक्रम आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community