गणेशोत्सवामध्ये पुण्यात सेना – भाजपामध्ये पेटणार वाद! संजय राऊत ‘टार्गेट’!

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी निवडणुकीचा आखाडा बनणार आहे.

पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाय ठेवून दाखवावा, त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. त्याला आता शिवसेनेने प्रति आव्हान दिले आहे. गणेशोत्सवात संजय राऊत पुण्यात येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा, आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे सेनेने म्हटले आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी निवडणुकीचा आखाडा बनणार आहे, अशी शक्यता बनली आहे.

पुण्यात सेना-भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध कारणीभूत!

सध्या पुण्यात येऊन शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध करतात. चंद्रकांत पाटील यांनी ‘पाठीत खंजीर खुपसणारा राज्यासमोर दुसरा चेहरा समोर आला आहे’, असे सांगत अप्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘आम्ही समोरून कोथळा काढणारे आहे’, असे वक्तव्य केले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांचे वक्तव्य भडकावू असून नारायण राणे यांना ज्या धर्तीवर अटक करण्यात आली होती, त्याच धर्तीवर अटक करण्यात यावी’, अशी मागणी पाटील यांनी केली.

(हेही वाचा : राणीबागेत पेंग्विनवरील खर्च पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठीच! मनसेचा आरोप)

संजय राऊत गणेशोत्सवात पुण्यामध्ये येणार!

तसेच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मुळीक यांनी ‘जर संजय राऊत यांना अटक केली नाही, तर राऊत यांना पुण्यात पाय ठेवून देणार नाही, त्यांना पुण्यात फिरू देणार नाही’, असा इशारा दिला दिला आहे. त्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘गणेशोत्सवात संजय राऊत हे पुण्यात येणार आहे, त्यांना अडवून दाखवा, आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’, असे प्रती आव्हान दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here