संजय राऊतांना कोठडीतही शांत बसवेना!

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर दररोज माध्यमांसमोर येऊन निरनिराळ्या विषयांवर तासनतास भाषणबाजी करणाऱ्या संजय राऊतांना ‘ईडी’ कोठडीतही शांत बसवत नसल्याचे दिसून येत आहे. तेथे संवाद साधायला माध्यम प्रतिनिधी वा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते नसल्यामुळे त्यांनी आता पत्राचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच त्यांनी मित्रपक्षांना पत्र लिहित पडत्या काळात साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

समविचारी पक्षांचे गोडवे गाण्यास सुरुवात…

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, सध्या त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मात्र, दिवसभर सक्तवसूली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन झाल्यानंतर उर्वरित वेळेत काय करावे, असा प्रश्न राऊतांसमोर उभा राहिला आहे. माध्यमांना प्रवेश दिला असता, तर कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या भविष्यवाण्या करीत त्यांनी वेळ घालवला असता. पण, आता कुंचल्याचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नाही. त्यामुळेच पत्रलेखनातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांचे गोडवे गाण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसने प्रवास करताना बुक करा तुमची जागा; लवकरच सुरू होणार आरक्षण सुविधा! )

काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘अडचणीच्या काळातच आपल्यासोबत कोण आहेत, ते कळते. माझ्यावर झालेल्या कारवाईविरोधात कृती आणि विचारातून तुम्ही मला पाठिंबा दिला. संसदेत आणि संसदेबाहेर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्यासाठी आभार मानतो. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला रडायचे नाही, लढायचे अशी शिकवण दिली आहे. त्याच मार्गाने आम्ही जात आहोत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापुढे मी झुकणार नाही, अंतिम श्वासापर्यंत लढत राहीन. विजय आमचाच होणार आहे’, असे राऊत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here