Ramdas Athavale : संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुतीमध्ये एकजूट – रामदास आठवले

114
Ramdas Athavale : संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुतीमध्ये एकजूट - रामदास आठवले

महायुती मजबूत आहे. महायुतीमध्ये एकजूट आहे. संजय राऊत मात्र मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी बेछूट कपोलकल्पित आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संजय राऊत यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आणि चुकीचे आहेत, असे मत सोमवारी (२७ मे) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केले. (Ramdas Athavale)

प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ही अत्यंत चुकीची आणि खोटे आरोप केलेले असून संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे निषेधार्ह आहे, असेही आठवले (Ramdas Athavale) म्हणाले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे चांगले लोकप्रिय ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आहेत. ते चांगले काम करतात. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपा रिपाई महायुतीने केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना रसद पुरवली हा त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचा आणि मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी संजय राऊत यांनी केलं आहे. या आरोपाचा आम्ही निषेध करतो. (Ramdas Athavale)

(हेही वाचा – Pune Car Accident : मी सर्वांची नावे घेईन; अटकेतील डॉ. तावरेंचा इशारा)

संजय राऊत यांनी संभ्रम निर्माण करू नये…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिपब्लिकन पक्षासह सर्व महायुती नेत्यांनी महाविकास आघाडीला पराभूत करण्याचा एकजुटीने प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेला आरोप हा अत्यंत निषेधार्ह खोटा आरोप आहे. अजित पवार यांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रयत्न केल्याचा संजय राऊत यांचा आरोप निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे आणि भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. (Ramdas Athavale)

महायुतीचे सर्व घटकपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व महायुती नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चुकीचे आरोप करून संजय राऊत यांनी संभ्रम निर्माण करू नये महायुती ही मजबूत आहे. महायुतीमध्ये एकजूट आहे. संजय राऊत यांचे आरोप हे कारस्थानी आरोप आहेत. महायुतीमध्ये (Mahayuti) असे कोणतेही कपटकारस्थान होत नाही सर्व महायुतीमध्ये मनापासून एकजूट आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सर्व घटकपक्ष एकजुटीने लढले असून त्याचा परिणाम म्हणून महायुतीचा महाराष्ट्रात मोठा विजय होईल, असे आठवलेंनी मत व्यक्त केले. (Ramdas Athavale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.