गेल्या अनेक दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटावर काही राज्यांमध्ये बंदी घातली होती, तर काही राज्यांमध्ये चित्रपटावरील करमुक्त केला होता. तसेच या चित्रपटावरील बंदीचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अशातच ‘द केरल स्टोरी’च्या धर्तीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असे या चित्रपटाचे नाव असणार असून हा ऐतिहासिक चित्रपट असेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – Amit Shah : “मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील”- अमित शहा यांची भविष्यवाणी)
नक्की संजय राऊत काय म्हणाले?
देशात ‘द केरला स्टोरी’ सारखे चित्रपट येत असतील तर आम्ही ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ हा चित्रपट काढणार आहे. मी विवेक अग्निहोत्री आणि ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांना या खोका स्टोरीची कथा देणार आहे. खोका स्टोरी हा मोठा ऐतिहासिक चित्रपट असेल. या चित्रपटामध्ये माणसे कमी आणि खोके जास्त असतील, असे संजय राऊत मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच पुढे राऊत शिंदे गटाला डिवचत म्हणाले की, शिंदे गट हा कोणताही पक्ष नसून भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. त्या कधीही कापल्या जातील. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. निवडणूक आयोगाने एखादा निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community