शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा घुमजाव करत भूमिका बदलली. छगन भुजबळ हे शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केलेल्या राऊत बुधवारी १९ जुलैला म्हणाले भुजबळ शिवसेनेत नाही तर कोणत्याही पक्षात असते तर मुख्यमंत्री झाले असते. (Sanjay Raut)
दोन आठवड्यात दुसऱ्यांदा घुमजाव
६ जूनला सकाळच्या सत्रात आयोजित पत्रकार परिषदेत, “शिवसेना उबाठा नसती तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का?” असा थेट सवाल राऊत यांनी केला होता. तर दुसऱ्याच दिवशी ७ जूनला राऊत यांनी घुमजाव करत काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेचा प्रचार केला, शरद पवार यांनी उबाठा आणि काँग्रेसचा तर उबाठाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम केले, असे सांगितले. (Sanjay Raut)
(हेही वाचा – T20 World Cup, Lockie Ferguson : ४ निर्धाव षटकं आणि ३ बळी, लॉकी फर्ग्युसनने रचला इतिहास)
शिवसेनेत नाही, तर एका पक्षात राहिले असते तर..
आज बुधवारी राऊत म्हणाले, “भुजबळ एकेकाळी शिवसेनेत असताना ते मोठे नेता होते, आमचेही नेते होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. जर ते एका पक्षात राहिले असते तर नक्कीच मुख्यमंत्री झाले असते,” असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community