पत्राचाळीतील मराठी माणसाला बेघर करण्याचा आरोप असलेल्या संजय राऊत यांना ऑर्थर रोड तुरुंगात एक नवी ओळख मिळालेली आहे. कैदी नंबर ८९५९. संजय राऊत यांचं काही दिवसांपूर्वी तुरुंगात शौचालयाच्या कारणास्तव भांडण झालं होतं. मग काही कैद्यांनी त्यांना मारायची धमकी दिली. घाबरलेल्या राऊतांनी तक्रार केल्यावर त्यांना आता स्वतंत्र खोलीत ठेवल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.
राऊतांची कारकीर्द
सध्या प्रसारमाध्यमांकडे बातम्या राहिलेल्या नाहीत, त्यांना बातम्या मिळवता येत नाहीत. म्हणून ते बातम्या निर्माण करतात. मग त्यांना संजय राऊतांच्या शौचालयाची बातमी द्यावीशी वाटते. या बातमीमुळे समाजात काय बदल घडणार आहे? बरं यात गॉसिप्स देखील नाही. मग प्रसारमाध्यमांना ही बातमी दाखवून काय साध्य करायचं आहे? आता तर संजय राऊतांचा तुरुंगातील दिवस कसा जातो, याविषयी बातम्या दाखवत आहेत. संजय राऊत तुरुंगातील लायब्ररीत वेळ घालवतात, ते लिखाणात वेळ घालवतात. मला एक गोष्ट कळत नाही संजय राऊतांवर जे आरोप आहेत, ते गंभीर आहेत. पत्रा चाळीतील सामान्य मराठी माणसाला बेघर करुन पैसे खाल्ल्याचे आरोप असताना त्यांना स्वातंत्र्यसैनिक असल्याची वागणूक का दिली जात आहे? स्वप्ना पाटकर या महिलेला त्यांनी मानसिक त्रास दिलेला आहे, तिला गलिच्छ शिव्या दिलेल्या आहेत, मारण्याची धमकी दिली आहे.
(हेही वाचा उद्धव ठाकरे सेक्युलर मुद्दे का उचलून धरत आहेत?)जीग
राऊतांचा मराठी माणसाशी संबंध नाही
अशा संजय राऊतांना प्रसिद्धी करण्याचा घाट मराठी माध्यमांनी का घातलेला आहे? या घोटाळ्यातील थोडा हिस्सा या माध्यमांना देखील मिळाला आहे का? असा सवाल विचारावासा वाटतो. संजय राऊत तुरुंगात काय करतो याच्याशी जनतेचा काय संबंध? एका भ्रष्टाचारी माणसाच्या तुरुंगातील जीवनाशी सामान्य मराठी माणसाचा काहीही संबंध नाही. उद्या जर जनतेने या माध्यमांवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला तर त्याचीही बातमी बनवाल का?
Join Our WhatsApp Community