‘राऊतांना पुन्हा जेलवारी घडवणार; अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलंय’; नारायण राणेंचा इशारा

141

संजय राऊत यांनी 26 डिसेंबरला लिहिलेल्या अग्रलेखाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. मी त्यांच्यावर खटला करुन त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवेन, असा इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. ते शुक्रवारी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

26 डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते, हा माझा वाईट स्वभाव आहे. त्यामुळे संजय राऊतांनी लिहिलेला 26 डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत 100 दिवस आर्थर रोड तुरुगांत राहिले, ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुगांत जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतो आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( हेही वाचा: मोठी बातमी: अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; अल कायदाने भारतीय मुसलमानांना केले ‘हे’ आवाहन )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.