सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.
(हेही वाचा पोलिसांच्या वाहनातून उमेदवारांना रसद पुरवली जाते; शरद पवारांच्या आरोपावर Devendra Fadnavis काय म्हणाले?)
काय म्हणाले संजय शिरसाट?
नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 2 दंगलींचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, या दंगली सूनियोजित होत्या. विधानसभा निवडणुकीच्या काळातही असा प्रकार केला जाणार असल्याची माहिती आहे. ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना सहजासहजी जिंकता येऊ नये असा त्यामागील विरोधकांचा हेतू आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे काही महिन्यांपूर्वी जातीय दंगल उसळली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही तणाव निर्माण झाला होता. एका धार्मिक नेत्याने दुसऱ्या धर्माच्या धर्मगुरुविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे एका समुदायाने गंगापूर, वैजापूर, खंडाळा येथे टायर जाळून निदर्शन केली होती. यामुळे बाका प्रसंग उभा राहिला होता, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. शिवसेना आमदार छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. संजय शिरसाट या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी येथून सलग 3 वेळा विजय मिळवला आहे.
Join Our WhatsApp Community