ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकार, भाजपवर टीका करत असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी, १६ मे रोजी देखील शिंदे सरकार हे दिल्लीतली पायपुसणी झाल्याची टीका संजय राऊतांनी केली. त्यालाच प्रत्युत्तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी देऊन राऊतांवर सणसणीत टोलाच लगावला. संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी असल्याचा टोला शिरसाट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना लगावला.
नक्की संजय शिरसाट काय म्हणाले?
‘संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी आहे की नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. सकाळ, संध्याकाळ शरद पवार. त्यांच्या घरी जाणे-येणे. मग त्यात उद्धव ठाकरेंसुद्धा घेऊन जाणे. खऱ्या अर्थाने शरद पवारांची पायपुसणी संजय राऊत आहे,’ असे शिरसाट म्हणाले.
(हेही वाचा – Nitesh Rane : राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न – नितेश राणे यांचा आरोप)
तसेच शिंदे सरकारचा पोपट मेलाय, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, ‘कोणाचा पोपट मेला आहे, हे तुम्हाला ८ ते १० दिवसांत कळेल. ८ ते १० दिवस थोडी वाट पहा आणि मविआचा पोपट मेला नाही, तर त्याचा अंतविधी सुद्धा झालेला आहे. आता दिवस घालायचा टाईम लवकरच ८ ते १० दिवसांत येईल, असे मला एकंदरीत त्यांचा बैठकीवरून वाटतेय. यांच्यात कधी मेलमिलाप होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठाकरे गटाशी कधीही कॉम्प्रोमाईज करणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. आणि जर कॉम्प्रोमाईज झाले तर ठाकरे गटाला भिंगामधून पाहावे लागेल, असे चित्र ते निर्माण करतायत आणि हेच दुर्दैव आहे. संजय राऊतांसारखा माणूस ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी हे असेच चित्र तयार होणार आहे. हे निश्चित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community