भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध होता, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नवा वाद समोर आणला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता महायुतीच्या वतीनेदेखील पलटवार केला जातोय. संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री पद हवे होते, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीच्या अट्टहासामुळेच पक्षात फूट पडली किंवा विभागणी झाली, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Sanjay Shirsat)
२०१९मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत अडकला होता. दिल्लीतून काहीही निर्णय आला, तरी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार नाही, असा निरोप देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी मातोश्रीवर पाठवला होता. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळीदेखील अजित पवार, सुनील तटकरे यांनी दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास नकार दिला होता. असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे. या टिकेला आता महायुतीच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचा – Hotel Nilachal Puri: धार्मिक परंपरा लाभलेल्या पुरी शहरात मुक्काम करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?)
ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला
या संदर्भात आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेमध्ये जी फूट पडली किंवा विभागणी झाली त्यालादेखील हे एक कारण आहे. भाजपावर आरोप करून चालणार नाही. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला कायम सपोर्ट केला आहे. आपण एकत्र सरकार स्थापन करून असे भाजपाने म्हटले होते. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदही देण्यास भाजप तयार होते. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या अट्टहासामुळेच जे झाले त्याचे परिणाम आता सर्वांना दिसून येत आहे. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट हा ४ नंबरवर फेकला गेला. पक्षाची हानी झाली तरी चालेल पण मला खुर्ची हवी हा जो आग्रह होता, त्या आग्रहामुळेच घडलेले हे राजकारण असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community