‘शरद पवार सध्या पावसात जास्त भिजतायेत’, Sanjay Shirsat यांची तिरकस टीका

107
'शरद पवार सध्या पावसात जास्त भिजतायेत', Sanjay Shirsat यांची तिरकस टीका
  • प्रतिनिधी

बदलापूरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ (दि. २४) महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता शरद पवार यांच्यांसह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यानी भरपावसात आंदोलन केले. यावर स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरु असून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – Women’s T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांना ‘या’ तारखेला भिडणार)

आम्हाला देखील शॉवर लावून भाषण करावी लागतील…

शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजत आहे. लोकांना देखील वाटतं पावसात भिजल्याने निवडून येतो. आम्हाला देखील शॉवर लावून निवडणुकीत भाषण करावी लागतील, अशी तिरकस टीका शिरसाट (Sanjay Shirsat)  यांनी केली आहे.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  म्हणाले, आपापल्या पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. शरद पवार पुण्यात, उद्धव ठाकरे मुंबईत, आणि नाना पटोले ठाण्यात आपापल्या कार्यकर्त्यांसोबत बसले आहे. जे सरकारच्या हातात आहे ती सर्व कारवाई केली आहे.

सरकार कुणाचं आहे हे न पाहता सरकारला सूचना दिल्या असत्या तर समाजात एक संदेश गेला असता. काही लोकांना वेगळं काहीतरी करण्याची खाज आहे. आज त्यांच्या नाटकाचा भाग त्यांनी दाखवला, अशी टीका शिरसाट (Sanjay Shirsat)  यांनी केली.

(हेही वाचा – शत्रूच्या Submarines शोधण्यासाठी भारत आणणार ‘सोनोबॉय’)

माविआच्या आंदोलनाच्या विरोधात आंदोलनाची गरज नव्हती

बदलापूर प्रकरणावरून महाविकास आघाडीकडून बंद पुकारल्यानंतर हायकोर्टाने बंदला परवानगी नाकारली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडूनही मविआ विरोधात आंदोलन करण्यात आले. यावर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिकात्मक आंदोलनाची गरज नव्हती म्हणत शिरसाटांनी मित्रपक्षांनाही घरचा आहेर दिला आहे. (Sanjay Shirsat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.