शिवसेनेमधून बाहेत पडून एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार शिरसाट हे शिंदे गटाची बाजू कायम आक्रमकतेने मांडत आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज आहे. ते वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत. शिरसाट यांनी रविवारी, २१ ऑगस्ट रोजीही पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज
संजय शिरसाट यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले की, अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले आहेत, अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केले आहे. तरीही मंत्रिपद मिळाले नाही. सध्या ज्येष्ठतेचा विचार कुणी करत नाही, त्यामुळे आमचाही विचार करावा, असे आमदार शिरसाट म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज आहे. त्यांचे समाधान करणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आव्हान बनले आहे.
(हेही वाचा विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!)
Join Our WhatsApp Community