मविआच्या सभेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, संजय शिरसाट यांचा इशारा

100

महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजीनगर शहरात २ एप्रिलला होणार आहे. या सभेवरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे, महाविकास आघाडीच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असणार असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.

( हेही वाचा : मविआच्या सभेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, संजय शिरसाट यांचा इशारा)

परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार

छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे, असे वातावरण असताना सभा घेणे बरोबर नाही परंतु जर विरोध केला तर हे लोकशाहीचा गळा घोटला असे म्हणतात. या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असतील असे संजय शिरसाट म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.