Lok Sabha elections : …हा तर वातावरण निर्मितीचा प्रकार; संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले

408
Lok Sabha elections : ...हा तर वातावरण निर्मितीचा प्रकार; संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले
Lok Sabha elections : ...हा तर वातावरण निर्मितीचा प्रकार; संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले
शिवसेनेकडून (Shivsena shinde) उमेदवारी मिळत नसल्याने शिंदेंसोबत असलेले काही उमेदवार हे नाराज असून ते वेगळा विचार करत आहेत असा दावा शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे (Susama andhare) यांनी केला आहे. शिवसेनेतील (Shivsena shinde gat) काही उमेदवारांच्या उमेदवाऱ्या रद्द होणार असल्याने ते आतापासूनच शिवसेनेच्या उबाठा मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा देखील सुषमा अंधारे (Susama andhare) यांनी केला होता. यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी याचा साफ शब्दात इंकार करीत हा फक्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार असल्याचे बोलून दाखवले आहे. (Lok Sabha Elections)
बरेच नेते आमच्या संपर्कात – सुषमा अंधारे
महायुतीमध्ये उमेदवारी मिळत नसल्याने नाराज झालेले बरेच नेते हे आमच्या संपर्कात असून ते पुन्हा मागे फिरणार असल्या संदर्भातला दावा सुषमा अंधारे (Susama andhare) यांनी याआधी केला होता. नाशिक, हिंगोली, यवतमाळ, रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवारी जाहीर झालेले नाहीत किंवा काही ठिकाणी दिलेले उमेदवार बदलण्याची भाजपकडून मागणी झाली आहे, याबद्दल सुषमा अंधारे (Susama andhare) बोलत होत्या. (Lok Sabha Elections)
गद्दारांना परतीचे दरवाजे बंद – संजय राऊत
लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याने काही शिवसेना नेते हे आतापासूनच शिवसेना उबाठा गटाकडे येत असल्याचे दावे केल्यानंतर यावर उत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापुढे गद्दारांना परतीचे दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Elections)
तुमच्याकडे येतच कोण आहे – संजय शिरसाट
कोणीही कुठेही जात नाही असे असताना विनाकारण वावड्या उठवल्या जात आहेत. आमचे नेते हे आमच्या संपर्कात असून कोणीही उबाठामध्ये जात नसल्याचा दावा करीत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रश्नावर विचारले असता तुमच्याकडे नक्की कोण येत आहे. असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना केला आहे. (Lok Sabha Elections)
ठाकरे गटाचे आठ आमदार संपर्कात – उदय सामंत
आमच्या पक्षातील कोणीही ठाकरे गटाच्या संपर्कात नसून उलट ठाकरे गटाचे आठ आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत (Uday Samantha) यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला आहे. (Sanjay Shirsath)
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) रंग आता चढू लागला असतानाच अजूनही कोण कुठून लढणार आहे हे मात्र ठरलेले नसताना हा माझ्या संपर्कात किंवा तो माझ्या संपर्कात असे दावे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. नक्की कोण कोणाच्या संपर्कात आहे हे येणाऱ्या काही दिवसातच कळून येईल. (Lok Sabha elections)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.