विधानसभा निवडणूकीचा (Vidhan Sabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच अजून ही सुल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठा आरोप केला आहे. उबाठा गटात (UBT Group) आर्थिक देवाण-घेवाण करुन उमेदवारी दिली. निष्ठावानांना डावलून बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. तुमच्याकडे आले तर ते निष्ठावान आणि दुसऱ्या पक्षात गेले तर गद्दार असा सवाल ही शिरसाट यांनी लगावला आहे. (Sanjay Shirsat)
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (Congress) युती करू नका आम्ही सांगायचो, त्यांच्याबरोबर युती केल्यावर काय परिणाम होतात. तुमच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला कसे सुनावले जाते. तुटेपर्यंत ताणू नका हे सांगितले जाते ही नामुष्मीची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे विधान संजय शिरसाट यांनी केले. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, शिवबंधन बांधले, एबी फॉर्म दिला आणि निवडणुकीला लागा हे सर्व प्रकार पैशा शिवाय होत नाही. यात निश्चितच पैशाची देवाण-घेवाण झाली आहे. असा आरोप शिवसेना उबाठा गटावर केला.
(हेही वाचा – Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन स्थळांना मुबलक निधी)
उबाठाला असे वाटत होते की आमच्यामुळे इतर पक्ष चालत आहेत, त्यांना काँग्रेसने चांगली चपराक दिली आहे. माईक खेचाताणीपर्यंत त्यांचा प्रकार गेला आहे. शिवसेना प्रमुखांनी तयार केलेल्या नेत्यांची अशी अवस्था शुक्रवारी महाराष्ट्राने अनुभवली म्हणत शिंदेंचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. (Sanjay Shirsat)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community