-
मुंबई प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत आहेत. यामुळे राज्याचे राजकारण वेगळे वळण घेत आहे. सत्ताधारी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो.याचीच प्रचिती सध्या पाहायला मिळत आहे. (Sanjay Shirsat)
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तर आता त्यांची कन्या हर्षदा शिरसाट या देखील चर्चेत आल्या आहेत, पण त्याला एक वेगळेच कारण आहे. कोणतेही पद नसताना हर्षदा यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील गोलवाडी, तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको भागाची संबधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Sanjay Shirsat)
मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा परस्पर आढावा घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील काही फोटोग्राफ देखील हर्षदा शिरसाठ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. परंतु याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया वरून सदरचे फोटो डिलीट केले आहेत. या प्रकरणामुळे सरकारी अधिकारी आणि संसाधनांचा मंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. (Sanjay Shirsat)
सिडकोचे चेअरमन पद अजूनही संजय शिरसाठ यांच्याकडेच आहे. हर्षदा शिरसाट यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत सिडकोच्या विविध प्रकल्पस्थळांना भेटी देऊन कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामांबाबत सूचना केल्याचेही सांगण्यात येते. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नसताना त्यांनी हा आढावा घेतल्याने हा प्रकार वादग्रस्त ठरला आहे. विरोधकांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली असून, मंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी अधिकार्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा- Sovereign Gold Scheme : केंद्र सरकार सोव्हरिन गोल्ड फंड बंद करणार? सध्याच्या गुंतवणूकदारांचं काय होणार?)
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारले की, “सरकारी अधिकारी, वाहने आणि यंत्रणा मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या दिमतीसाठी आहेत का ? याबाबत सरकार स्पष्टीकरण देईल का ?” तसेच, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Sanjay Shirsat)
दरम्यान, हर्षदा शिरसाट यांनी आपण विकासकामांमध्ये रस घेत असल्याने ही पाहणी केली असल्याचे सांगितले. मात्र, या कृतीमुळे शिरसाट कुटुंबाला होणाऱ्या टीकेची झळ बसण्याची शक्यता आहे. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा- India Poverty Report : भारतीय खेड्यांमध्ये खेळतोय पैसा, ग्रामीण भागातील गरिबी ५ टक्क्यांच्याही खाली)
या वादामुळे मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर राजकीय दबाव वाढला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर हा संवेदनशील मुद्दा असल्याने, राज्य सरकार याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sanjay Shirsat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community