छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj ) आपण दैवत मानतो. अशा दैवताबद्दल बोलताना अबू आझमींसारख्यांना भीती का वाटत नाही? उलट अबू आझमी (Abu Azmi) ज्यांना देव मानतात, त्यांच्याबद्दल बोलले. तर ‘सर तन से जुदा’ची ही भाषा बोलली जाते. येवढं बोलून ही त्यांना लाज वाटत नाही.त्यांनी इतिहासाचे (History) उदाहरण दिलेय. पण त्यांच्या धर्मिक पुस्तकात जे लिहलयं, त्याबद्दल आम्ही बोललो तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल?, असा सवाल आमदार संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांनी विधानसभेत उपस्थित केला.
पुढे संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात महापुरुषांचा इतिहास (History) नवीन पिढीला शिकवून राष्ट्रप्रेम त्यांच्या मनात निर्माण केले पाहिजे. अबू आझमी (Abu Azmi) सारख्या माणसाला या देशात माफी मिळायला नको, अशी टीकाही उपाध्याय (Sanjay Upadhyay) म्हणाले. तसेच राज्यात मजबूत सरकार असल्यामुळे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहेत. त्यातच राज्यातील सुरक्षा, शांतता, स्थिरता लक्षात घेता, राज्यात गेल्या १० वर्षात एकही बॉम्ब स्फोटाची घटना घडलेली नाही. त्यामुळे परकीय गुंतवणूक राज्यात येत आहे. पण बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi infiltrators) वाढती संख्या राज्यासाठी चिंतेची बाब आहे. बोरिवली मतदारसंघात तर ५ हजार बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. मजूरी, भाजीवाले, हॅकर्स प्रत्येक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर आहेत, अशी माहिती उपाध्याय (Sanjay Upadhyay) म्हणाले.
Join Our WhatsApp Community