केंद्रीय राज्यमंत्री (एमओएस) आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. संजीव बल्यान (Sanjeev Balyan) मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली शहरातील मधकारीपूर गावात शनिवारी (३० मार्च) रात्री उशिरा निवडणूक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचले. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संजीव बल्यान यांच्या ताफ्यातील अनेक वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
(हेही वाचा – Sanjay Nirupam : ‘कॉँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय उबाठा एकही जागा जिंकू शकत नाही’)
पोलिसांकडून चौकशी सुरु :
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. (Sanjeev Balyan)
एसपी सिटी सत्यनारायण म्हणाले की,
आज मधकरीमपूर गावात प्रमुख राकेश कुमार यांच्या घरी एक कार्यक्रम होता. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा (Sanjeev Balyan) ताफा गावात पोहोचला तेव्हा काही तरुणांचा जमाव रस्त्याच्या कडेला उभा राहिला आणि त्यांनी प्रथम घोषणाबाजी केली. यानंतर जमावाने त्यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत माजी आमदार संजीव (Sanjeev Balyan) यांच्यासह अनेक भाजप नेते जखमी झाले. पोलीस गावात पोहोचले आणि प्रकरणाची चौकशी केली. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या वाहनांच्या तोडफोडीसह प्राप्त झालेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला जात आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. (Sanjeev Balyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community