संसदेत महाराष्ट्रातील नेत्यांनी कायमंच आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. प्राईम पॉइंट फाऊंडेशन तर्फे संसदेतील 11 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यापैकी 4 खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
प्राईम पॉइंट फाऊंडेशन कडून मंगळवारी संसद रत्न खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेच्या 8 आणि राज्यसभेच्या 3 खासदारांसह एकूण 11 खासदारांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 4 खासदारांपैकी 3 महिला खासदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील कन्यारत्नांनी संसदेतही बाजी मारली आहे.
(हेही वाचाः ठाण्यात भाजपचे… ‘वॉर अगेंस्ट टँकर माफिया’!)
महाराष्ट्रातील संसद रत्न
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपच्या हीना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया तहसीन अहमद खान आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे महाराष्ट्रातील या खासदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांना सातव्यांदा हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे खासदार एन के प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
(हेही वाचाः केंद्राच्या निधीतून का नाकारल्या ‘बेस्ट’ने बस? हे आहे कारण…)
प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय, अंदमान व निकोबार बेट येथील काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा, झारखंडमधील भाजप खासदार विद्युत बरन महतो, शिवसेना खासदार हीना गावित, मध्य प्रदेशातील खासदार सुधीर गुप्ता यांना त्यांच्या 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
तर बीजेडी खासदार अमर पटनायक, आखसदार सुप्रिया सुळे, फौजिया खान यांना 2021 मध्ये सिटींग सदस्यांच्या श्रेणीतील उत्तम कामगिरीबाबत सन्मानित करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः ‘गंगुबाई काठियावाडी’ पुन्हा वादात! मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल)
संसदेच्या अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयांच्या चार समित्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community