संसदेच्या (Sansad) आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे कार्यालय देण्यात आले आहे ते शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आले आहे असा खुलासा आज लोकसभा सचिवालयाकडून करण्यात आला आहे.
18 व्या लोकसभेत निवडून आलेल्या राजकीय पक्षांना संसदेच्या आवारात कार्यालय देण्यात आले आहे. कार्यालय देण्याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्षांकडून घेतला जातो. विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून काल 10 राजकीय पक्षांना कार्यालय देण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली जागा
महत्वाचे म्हणजे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला संविधान सदनात 126—ड क्रमांकाची खोली कार्यालय म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – ‘उबाठा’च्या अजान स्पर्धेनंतर भायखळ्यात आता शिवसेनेच्या आमदाराकडून Burqa वाटप)
शिंदे आणि ठाकरे यांचा पक्षही स्थिरावला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 17 व्या लोकसभेत जे कार्यालय देण्यात आले होते. तेच कार्यालय आताही कायम ठेवण्यात आले आहे. तर, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला संविधान सदनातच्या तिस—या मजल्यावरील 128—अ क्रमांकाची खोली कार्यालयासाठी देण्यात आली आहे.
10 राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप
लोकसभा सचिवालयाने काल 10 राजकीय पक्षांना त्यांच्या क्षमतेनुसार कार्यालयाचे वाटप केले होते. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचेही नाव होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाच्या नेतृत्वातील? याबाबत स्पष्ट उल्लेख नव्हता. लोकसभा कार्यालयाने आज सुधारित परिपत्रक काढले. यात दि. 11 सप्टेबर रोजी ज्या राकॉला संसदेच्या (Sansad) जुन्या इमारतीत कार्यालय देण्यात आले होते ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला देण्यात आले आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
लोकसभा सचिवालयाच्या इस्टेट आणि हेरिटेज मॅनेजमेंट शाखेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, समाजवादी पार्टी, जनता दल (युनायटेड), तेलगू देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बिजू जनता दल आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांना कार्यालय देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Vidhanasabha Election 2024 : महायुती मध्ये आणखी एक मित्र पक्ष नाराज ?)
टीडीपी आणि वायएसआर नवीन इमारतीत
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि वायएसआर कॉग्रेसला संसदेच्या नवीन इमारतीत कार्यालय देण्यात आले आहे. उर्वरित पक्षांना संसदेच्या जुन्या इमारतीत अर्थात संविधान सदन येथे कार्यालय देण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, संसदेची नवीन इमारत सर्व अत्याधुनिक सोयी—सुविधांनी सज्ज आहे. तरीसुध्दा, विरोधी पक्षांनी संविधान सदनातच कार्यालय राहू देण्याला पसंती दर्शविली आहे. जुनी इमारतीतील सध्याची कार्यालये “अधिक सोयीस्कर” असल्याचे मत विरोधी पक्षांकडून वर्तविले गेले आहे.
सपाला 3 खोल्या
संसदेत (Sansad) राजकीय पक्षांच्या क्षमतेनुसार कार्यालय दिले जाते. समाजवादी पक्षाचे लोसकभेत 37 आणि राज्यसभेत चार असे 41 खासदार आहेत. यामुळे सपाला तीन खोल्या (130 आणि 126-18&ll) कार्यालयासाठी देण्यात आल्या आहेत. -संबंध सदनच्या तिसऱ्या मजल्यावर देण्यात आल्या आहेत. सपा संसदेतील (Sansad) चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. 16 खासदारांच्या जेडीयूला संविधान सदनच्या तिसऱ्या मजल्यावर 135 आणि 136 क्रमांकाचे कार्यालय देण्यात आले आहे. खोल्या असतील.
केंद्र आणि आंध्र प्रदेशातील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या टीडीपीला नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक खोली देण्यात आली आहे. AAP आणि BJD च्या जुन्या इमारतीत तळमजल्यावर खोल्या आहेत. परिपत्रकात नमूद केलेल्या इतर पक्षांनी तिसऱ्या मजल्यावर त्यांची कार्यालये कायम ठेवली आहेत ज्यात जुन्या इमारतीतील बहुतेक पक्ष कार्यालये आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community