नवनीत राणांनी वापरले पोलीस अधिकाऱ्यांचे वॉशरूम! पोलिसांनी अहवालात केले नमूद

125

आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी आपल्याला साधे पाणी दिले नाही आणि बाथरूमही वापरू दिले नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. त्यामुळे आता पोलीस त्यांच्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी पुरावे सादर करायला लागले आहेत. त्यासाठी पोलीस ठाण्यात असताना नवनीत राणा यांची कशी खातरदारी केली, याचे व्हिडीओ अहवालात सादर करत आहेत. त्यामध्ये नवनीत राणा यांना तर पोलीस अधिकाऱ्याचे वॉशरूम वापरायला दिले, असे अहवालात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांचा अहवाल तयार 

नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पोलिसांनी आपल्याशी जात्यंध स्वरूपाचे वर्तन केल्याचे कळवले. त्याची गंभीर दखल घेत अध्यक्षांनी थेट पोलिसांच्या वर्तवणुकीसंबंधी अहवाल मागवला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची बाजू सावरण्यासाठी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांना कोठडीत असताना बिसलेरीचे पाणी देण्यात आले. तेव्हाचे फोटो काढण्यात आले. इतकेच नाही, तर लॉकअपच्या आवारात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुम देखील नवनीत राणा यांना वापरण्यासाठी दिले होते. हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाल्याचा पोलिसांचा दावा असून त्यांनी यासंदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यामध्ये नवनीत राणा यांना पोलिसांनी चहा आणि बिस्किटे दिल्याचे दिसत आहेत.

(हेही वाचा सदावर्ते पुन्हा एसटी कामगारांची मोट बांधणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.