Punjabमध्ये सरपंचपदाचा उघड लीलाव; दोन कोटींची बोली

60
Punjabमध्ये सरपंचपदाचा उघड लीलाव; दोन कोटींची बोली
Punjabमध्ये सरपंचपदाचा उघड लीलाव; दोन कोटींची बोली

पंजाबमध्ये गावाचा सरपंच होण्यासाठी स्थानिक नेत्याकडून बोली लावली जात असल्याचा मुद्दा आता न्यायालयात पोहचला आहे. गुरूदासपूर येथील भाजपा नेत्याने सरपंच होण्यासाठी दोन कोटी रुपयाची बोली लावली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. राजकीय पक्षाकडून फार तर राज्य पातळीवर याची चर्चा केली जाते. मात्र पंजाबमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने अख्ख्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

सविस्तर वृत्त असे की, पंजाबमध्ये 13237 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 13237 सरपंच निवडले जाणार आहेत. तर 83437 सदस्य निवडले जाणार आहेत. पंजाबमध्ये पद आणि प्रतिष्ठा किती महत्वाची आहे याची जाणीव या गोष्टीवरूनच होते की येथील स्थानिक नेत्याकडून सरपंच होण्यासाठी बोली लावली जाते.

(हेही वाचा – Assembly Elections : महायुती, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष मोठ्या पक्षांना देत आहेत इशारे)

गुरूदासपूर जिल्ह्यातील हरदोवाल कला या गावातील भाजपाच्या स्थानिक नेते आत्मा सिंग यांनी सरपंच पदासाठी दोन कोटी रुपयाची बोली लावली आहे. याशिवाय मुक्तसर आणि भटीडा येथेही अशा प्रकारची बोली लावण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, आत्मा सिंग यांनी बोलीची रक्कम आणखी वाढविता येईल असेही म्हटले आहे. मुळात, पंजाबमध्ये (Punjab) सरपंच पदासाठी बोली लावली जाते. जो जास्त पैश्याची बोली लावतो त्याची सरपंचपदी गावचे नागरिक एकमताने निवड करतात. बोलीची रक्कम ही विकास कामावर खर्च केली जाते, हे येथे उल्लेखनीय.

(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्राची आई जेव्हा पंतप्रधान मोदींना चुरमा पाठवते….)

लीलाव पद्धतीने सरपंच होण्याचा मुद्दा न्यायालयात गेला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे. पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान एकीकडे सरपंच पदाच्या निवडणुकीत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करत असताना त्याच्या अगदी विरुद्ध प्रकार घडताना दिसतो आहे. निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली असून या लिलावांची माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व २३ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना २४ तासांची मुदत दिली आहे.

गावात बोली लावण्याचा प्रकार सुरुच आहे, भटिंडा जिल्ह्यातील गेहरी बुट्टर गावात ६० लाख रुपयांची बोली लावण्यात आली तर गिडायहाजवळील कोठे चिडियावली येथे ३५.५० लाख रुपयांची बोली लागली. न्यूयॉर्कमधील करमजीत सिंग यालीवाल यांनी मोगा जिल्ह्यातील सेदोके या त्यांच्या मूळ गावाच्या पंचायतीला ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र निवडणुका सर्वानुमते घेण्याची अट त्यांनी ठेवली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.