Satara LS Constituency : साताऱ्यात उदयनराजे यांचाच झेंडा

उदयनराजे यांनी या मतदार संघाचे तीनवेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००९ आणि २०१४ प्रमाणे २०१९ मध्ये उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकले होते.

174
Satara LS Constituency : साताऱ्यात उदयनराजे यांचाच झेंडा

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून राजकीय भेटीगाठी घेत, मतांची जुळवाजुळव करत, आपल्या विजयाचा झेंडा साताऱ्यात रोवण्याची जोरदार तयारी केली असल्याचे चित्र दिसत आहे. साताऱ्यात तिसऱ्या टप्प्यात ७ मे ला मतदान होणार आहे. (Satara LS Constituency)

सातारा मतदार संघात एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे (५८) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) शशिकांत शिंदे (६१) यांच्यात थेट लढत होणार आहे. (Satara LS Constituency)

महायुतीची ताकद मोठी

सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद मोठी असून वाई, कोरेगाव, पाटण आणि सातारा विधानसभेत शिवसेना (शिंदे), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार आहेत तर कराड दक्षिण आणि कराड उत्तर या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गट आणि कराड दक्षिण काँग्रेसचे आमदार आहेत. (Satara LS Constituency)

अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष

विशेष म्हणजे सहापैकी चार मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यातील विद्यमान मंत्री शंभुराज देसाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्यामुळे सातारा मतदार संघाकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. (Satara LS Constituency)

उदयनराजे यांनी या मतदार संघाचे तीनवेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००९ आणि २०१४ प्रमाणे २०१९ मध्ये उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकले होते. मंत्रे २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर काही महिन्यातच उदयनराजे यांनी पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आणि साताऱ्यावर लोकसभा पोटनिवडणूक लादली गेली. तेव्हा उदयनराजे यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली आणि शरद पवार यांनी त्यांचे जुने सहकारी श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले. मतदारांनी त्यांना नाकारले आणि पाटील यांना लोकसभेत पाठवले. (Satara LS Constituency)

परिस्थिति उदयनराजे यांच्यासाठी अनुकूल

यावेळी मात्र परिस्थिति उदयनराजे यांच्यासाठी अनुकूल आहे. तसेच उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. निंबाळकर आणि शशिकांत शिंदे यांचे जिल्हा बँक राजकारणातील संबंध सर्वश्रुत आहेत, त्याचा लाभ उदयनराजे यांना होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे महायुतीकडून यावेळी उदयनराजे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी सर्व स्तरतून प्रयत्न होत आहे. (Satara LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.