सतेज पाटील यांच्या दुष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा; Dhananjay Mahadik यांची बोचरी टीका

111
सतेज पाटील यांच्या दुष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा; Dhananjay Mahadik यांची बोचरी टीका
सतेज पाटील यांच्या दुष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा; Dhananjay Mahadik यांची बोचरी टीका

कोल्हापूर (Kolhapur Assembly) उत्तरमध्ये कॉंग्रेस (Congress) उमेदवार मधुरीमाराजे (Madhurimaraj) यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी बोचरी टीका केली आहे. कोल्हापुरात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Dhananjay Mahadik)

दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होते म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान

पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, सतेज पाटील यांच्या दुष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. सुरुवातीला राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना उमेदवारी घोषित केली. दिल्लीवरून आलेली उमेदवारी  सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांनी त्याला विरोध केला. यामुळे उमेदवारी बदलाची नामुष्की सतेज पाटलांवर आली. उमेदवारीसाठी त्यांना थेट नवीन राजवाड्यावर जावा लागलं.  राजकारणासाठी या व्यक्तीने राजघराण्याचा कशा पद्धतीने वापर केला हे दिसतंय. मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेलं पत्र दुसऱ्या दिवशी आलं आणि वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिली पसंती त्यांची राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होते म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान आहे. 

सतेज पाटील एवढे मोठे झाले का?

“शाहू महाराजांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही नाही. राहुल गांधी यांनी घोषित केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर, सतेज पटील (Satej Patil) यांच्यावर आली आहे. हे सगळं झाल्यानंतर आम्ही टीव्हीवर जे दृश्य पाहिलं ते अतिशय मन हेलावून टाकणारं आहे. ज्या महाराजांना सहा महिन्यांपूर्वी गादीचा मान, गादीचा मान सांगत शाहू महाराजांसाठी मत मागत होते. ‘आज त्याच महाराजांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना बोलत होते’ सतेज पाटील एवढे मोठे झाले का, की ते राज घरणाऱ्यावर बोलायला लागले आहेत,” अशी टीकाही महाडिक यांनी केली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.