राज्यात सध्या आरक्षणाचा प्रश्न जटील होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख (vilasrao deshmukh speech) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला असून, त्यात त्यांनी ‘आरक्षण हे आर्थिक निकषांवर आधारित हवे’, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. (Reservation)
एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांनी सर्वपक्षीय नेत्यांसमोर आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, आर. आर. पाटील यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विलासराव म्हणतात, कुठल्या समाजाला आरक्षण द्यावे किंवा देऊ नये, याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु जातीनिहाय आरक्षण देण्याचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा संघर्ष सुरू होतो. किंबहुना भविष्यातही तो सतत सुरू राहणार आहे. (Reservation)
(हेही वाचा – Election Candidate : तिकिटासाठी नेत्यांची पळापळ; पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश)
त्यामुळे आर्थिक निकषांवर आधारित सवलती जर आपण सर्वांना द्यायचा विचार केला, तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आज कित्येकजण या शोधामध्ये आहेत की माझी जात कुठली? आणि त्यातून मला सवलत कशी मिळेल? त्यामुळे हा संघर्ष टाळायचा असेल, तर भविष्यात आर्थिक निकषांवरच सवलती दिल्या पाहिजेत. हा विचार कुठल्याही एका राजकीय पक्षाने करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी देशातील राष्ट्रीय पक्षांमध्ये मतैक्य निर्माण व्हावे लागेल. तरच भविष्यातील असे संघर्ष टाळता येतील, असे स्पष्ट मत विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे. (Reservation)
प्राप्त परिस्थितीत त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. जेव्हा जेव्हा आरक्षणाची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा स्व. विलासराव देशमुख यांच्या या भाषणाची लोकांना आठवण येईल, असे तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community