भाजपमुळे तांबेंचा विजय, आता त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घ्यावा – राधाकृष्ण विखे-पाटील

149

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांच्यासाठी काम केलं म्हणून त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याचं बोललं जात होत. तसंच यादरम्यान तांबेंना भाजप कार्यकर्त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली होती. आता विखे-पाटील यांनी सत्यजीत तांबेंचा विजय भाजपमुळे झाल्याचा दावा केला आहे. प्रसार माध्यमांसोबत बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, ‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंसाठी काम केलं. म्हणून त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता त्यांनी स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे. कारण ते आता अपक्ष म्हणून निवडणूक आलेत. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. त्यातच त्यांचं उत्तर दडलेलं आहे.’

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी, ८ फेब्रुवारीला सदस्यत्वाची शपथ दिली. विधान मंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, ॲड. आशिष शेलार, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन, तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत.

(हेही वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला: कोण रोहित पवार? म्हणतं आमदार प्रणिती शिंदेंनी काढली त्यांची मॅच्युरिटी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.