Rahul Gandhi संविधान घेऊन फिरतात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत; सात्यकी सावरकरांची टीका

123
Rahul Gandhi संविधान घेऊन फिरतात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत; सात्यकी सावरकरांची टीका
Rahul Gandhi संविधान घेऊन फिरतात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत; सात्यकी सावरकरांची टीका

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल गांधीविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. पंरतु दोन वेळा समन्स बजावूनही राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सात्यकी सावरकर म्हणाले की, एप्रिल २०२३ मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा दाखल केला आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने समन्स काढून दि. २ डिसेंबरला राहुल गांधी यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र हिवाळी अधिवेशनात असल्याने गांधी हजर राहू शकले नाहीत,  असे गांधी (Rahul Gandhi) यांच्या वकीलाने न्यायालयाला कळवले,अशी माहिती सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी दिली.(Satyaki Savarkar)

( हेही वाचा : Delhi Assembly Election : आता लक्ष्य दिल्ली विधानसभा निवडणूक

तसेच सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी म्हणजे संपूर्ण सावरकर कुटुंबियांसाठी चिंतेची बाब आहे. सावरकर प्रेमींच्या भावना आमच्यापर्यंत पोहचल्याने आम्ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाची दखल गांभीर्याने घेतलेली आहे. मात्र केस दाखल करून समन्स पोहचूनही राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयासमोर येत नसतील तर, गांधी सभांमध्ये जे संविधान घेऊन फिरतात, त्याला काहीही अर्थ उरत नाही. कारण न्यायपालिका हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. न्यायपालिकेचा आदर आपण केला पाहिजे, पण त्यांच्या वर्तनावरून दिसून येते की, न्यायालयाचे आदेश ते पाळत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अर्ज दाखल करण्यात आला आहे. पुढची सुनावणी १० जानेवारीला होणार आहे. पण त्या सुनावणीस राहुल गांधी (Rahul Gandhi) अनुउपस्थित राहिले तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकते, असे सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी सांगितले.(Satyaki Savarkar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.