शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. जेव्हा मी कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांच्याशी जोरदार वादावादी झाली आणि पाच मिनिटांतच शेतकरी आंदोलनावरुन आमच्यात वाद झाला, असे सत्यपाल मलिक यावेळी म्हणाले.
ते लोक माझ्यासाठी मेले आहेत का?
रविवारी हरियाणातील दादरी येथे एका सामाजिक कार्यक्रमाला संबोधित करताना मलिक म्हणाले, “जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझं त्यांच्याशी भांडणं झालं. त्यांना शेतकरी कायद्यांबाबत खूप गर्व होता. जेव्हा मी त्यांना सांगितले की, या आंदोलनात 500 लोक मेली आहेत. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, ते माझ्यासाठी मेले आहेत का?, तेव्हा त्यांना उत्तर देताना मी म्हणालो की, ते तुमच्यासाठीच मेले आहेत कारण तुम्ही राजे जे बनले आहात. त्यावरुन पुढच्याच क्षणी आमच्यात भांडण झाले, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले.
( हेही वाचा: तब्बल २१ महिन्यांनी होणार गटनेत्यांची सभा )
कशाचीही भीती वाटत नाही
केंद्र सरकारवर सातत्याने टीका करणारे सत्यपाल यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांना आपल्या पदावरुन काढून टाकंल जाईल याची अजिबात भीती वाटत नाही. मेघालयचे राज्यपाल होण्याआधी त्यांना जम्मू आणि काश्मीर तसेच, गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community