सौदीतच मशिदीवरील भोंग्यांवर बंदी! भारतात कधी? 

अखिल मुस्लिम समाजासाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मक्का-मदीना येथील सौदी सरकारने 'मशिदींवरील भोंगे हे महंमद पैगंबरांच्या शिकवणीविरुद्ध आहेत', असे म्हटले आहे.

सौदी अरेबिया आणि तेथील मक्का-मदीना हे मुस्लिमांसाठी पवित्र स्थानी आहे. आयुष्यात एकदा तरी मक्केला जाऊन हज यात्रा करण्याची मनीषा जगभरातील मुसलमानांची असते. त्याकरता लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असते. आज त्याच सौदीने मशिदीवरील भोंगे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जगभरातील मुसलमानांसाठी परिवर्तनाकरता महत्वाचा मानला जात आहे. भारतातील मशिदींवरील भोंग्यावर बंदी कधी येणार, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

निर्णयाचे उल्लंघन झाल्यास कारवाई! 

सौदी अरेबियाच्या इस्लामसंबंधी प्रकरणी स्थापन केलेल्या मंत्रालयाचे मंत्री डॉ. अब्दुल्लातिफ बिन अब्दुलअज़ीज़ अल-शेख यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मशिदींवर जे भोंगे लावले जातात, त्यावर प्रतिबंध आणण्यात येत आहे. केवळ अजान आणि सामूहिक प्रार्थनेच्या वेळीच केवळ मशिदीपुरताच भोंगा तोही ठराविक आवाजाच्या मर्यादेतच वापरता येणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा सौदी सरकारने दिला आहे.

महमंद पैगंबरांच्या शिकवणीचा दिला हवाला! 

या निर्णयामागे सौदीने महंमद पैगंबरांच्या शिकवणीचा हवाला दिला आहे. त्यामध्ये ‘तुमच्यातील प्रत्येक जण व्यक्तीगत स्वरूपात अल्लाला हाक मारत असतो. नमाज पठण करताना आपला आवाज दुसऱ्याच्या आवाजापेक्षा जास्त नसावा’, असे महंमद पैगंबराने म्हटले आहे, असे सौदीने म्हटले आहे.

(हेही वाचा : प्रयागराज येथील मशिदींवरील भोंगे सकाळपर्यंत बंद राहणार! पोलीस महानिरीक्षकांचा आदेश)

इस्लामिक विचारवंतांकडून समर्थन 

सौदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे इस्लामिक विचारवंतांनी समर्थन केले आहे. शेख महंमद बिन सालेह अल-उथैमीन आणि सालेह बिन फवजान अल-फवजान अशी विचारवंतांची नावे आहेत. भोंग्यांच्या आवाजाने मशिदींच्या जवळ राहणारे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होता, असेही या विचारवंतांचे म्हणणे आहे.

याआधीही विचार मांडलेला! 

याआधी सौदी सरकारने मशिदींवरील भोंग्यांवर विचार मांडला होता. इस्लामिक प्रकरणांसंबंधी मंत्रालयाने २०१९ मधील रमजानच्या महिन्यात मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्यास सांगितले होते.

सौदीत शक्य भारतात का नाही? 

अखिल मुस्लिम समाजासाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मक्का-मदीना येथील सौदी सरकारने मशिदींवरील भोंगे हे महंमद पैगंबरांच्या शिकवणीविरुद्ध आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे भारतातील मुसलमान हे स्वीकारणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते, म्हणून त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here