तुमच्या मनातील सावरकर द्वेष पुढे आला; भाजपाचा Uddhav Thackeray यांच्यावर पलटवार

99

सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत शिवरायांची माफी मागितली. त्यानंतर काँग्रेसवर हल्लाबोल करत ‘जे वीर सावरकर यांचा दररोज अवमान करतात त्यांना त्याबद्दल पश्चाताप होत नाही, असे म्हटले. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी, महाराजांची मग्रुरीने माफी मागून चालणार नाही, असे म्हटले. आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली.

काय म्हणाल्या चित्रा वाघ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले, ही फार मोठी शोकांतिका आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आहे. आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले. लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही, असे पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.

(हेही वाचा Mumbai Police : ऐन गणेशोत्सवादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई पोलीस दलात चिंतेचे वातावरण)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

तुम्ही कुणाकुणाची माफी मागणार आहात? भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार, राममंदिर गळतंय त्याची माफी मागणार, की घाई गडबडीने बांधलेले संसद गळतंय म्हणून माफी मागणार, दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळत आहे. कशाकशाची माफी मागणार? महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.