नवीन जिंदाल यांच्या आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांनीही काँग्रेस पक्षाची साथ सोडली आहे. सावित्री जिंदाल या हरियाणा सरकारमध्ये मंत्री होत्या. त्यांनी काल म्हणजेच बुधवार २७ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
(हेही वाचा – Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांचा भाजपात प्रवेश)
काँग्रेसची अवस्था नाजूक :
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी काँग्रेसची अवस्था नाजूक होत चालली आहे. उद्योगपती आणि हिसार माजी खासदार नवीन जिंदाल यांच्यानंतर आता त्यांची आई सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा :
ओ. पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा आणि हरियाणाच्या माजी मंत्री सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांनी बुधवारी रात्री उशिरा (27 मार्च) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Nirmala Sitharaman : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत)
सावित्री जिंदाल यांनी काय लिहिले?
मी (Savitri Jindal) आमदार म्हणून १० वर्षे हिसारच्या जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि मंत्री म्हणून हरियाणा राज्याची निःस्वार्थ सेवा केली आहे. हिसारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्व आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल मी नेहमीच आभारी राहीन, त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आणि माझा आदर केला.
मैंने विधायक के रूप में 10 साल हिसार की जनता का प्रतिनिधित्व किया और मंत्री के रूप में हरियाणा प्रदेश की निस्वार्थ सेवा की है।
हिसार की जनता ही मेरा परिवार है और मैं अपने परिवार की सलाह पर आज कांग्रेस पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे रही हूं । कांग्रेस नेतृत्व के समर्थन…
— Savitri Jindal (@SavitriJindal) March 27, 2024
एकूण मालमत्ता २ लाख कोटींपेक्षा जास्त आहे :
सावित्री जिंदाल (Savitri Jindal) या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्या सध्या ८४ वर्षांच्या आहेत आणि जिंदाल समूहाच्या मोठ्या व्यवसायाच्या प्रमुख आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, २८ मार्च २०२४ पर्यंत सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती २९.६ अब्ज डॉलर आहे. ही रक्कम २.४७ लाख कोटी रुपये इतकी आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सावित्री जिंदाल ५६ व्या क्रमांकावर आहे. (Savitri Jindal)
(हेही वाचा – Amol Kirtikar ED : ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून समन्स; ईडीकडे मुदतवाढीची मागणी)
नवीन जिंदाल यांचा भाजपात प्रवेश :
जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री सावित्री जिंदाल यांचे पुत्र नवीन जिंदाल यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community