तुम्ही SBI, HDFC, ICICI बँकेचे ग्राहक आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही देखील बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता कर्ज घेणे तुमच्यासाठी अधिक सोयिस्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बँकिंग व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण विधान करून मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले आदेश
ग्राहकांच्या गरजेनुसार बँकिंग व्यवस्था अधिक सुलभ करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले आहेत. बँकांनी ग्राहकांच्या सुविधांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्जदारांसाठी ही प्रक्रिया सुलभ होईल. यामुळे लोक अधिकाधिक बँकेशी जोडू शकतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – President Oath Ceremony : 25 जुलै रोजीच का होतो भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी?)
अर्थमंत्र्यांनी बँकांना कर्ज देण्याच्या तरतुदी उत्तम ठेवण्याची सूचना केली, जेणेकरून बँकिंगशी संबंधित काम सर्वसामान्यांसाठी सोपे होण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी उद्योग प्रतिनिधी आणि अर्थमंत्री यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही सूचना करण्यात आली होती. या सूचनांची अंमलबजावणी करा, असे या अर्थमंत्र्यांनी बँकांना सांगितले. अर्थमंत्र्यांच्या या सूचनेचे पालन केल्यास SBI, HDFC, ICICI सह सर्व बँकांच्या ग्राहकांना फायदा होईल.
पुढे अर्थमंत्री असेही म्हणाले, ‘बँकांना अधिकाधिक ग्राहकाचा विचार कण्याची गरज आहे, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. यासह ग्राहकांची सोय लक्षात घेऊन शक्य तितके मैत्रीपूर्ण राहणे आवश्यक आहे. अर्थमंत्र्यांच्या या सूचनेवर एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले की, ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेत डिजिटलायझेशनची प्रक्रिया वाढत आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंग संबंधित समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर बँकांमध्येही सुधारणा दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community