Sanjay Singh : आप नेते संजय सिंह यांना अखेर जामीन मंजूर

Sanjay Singh : न्यायालयाने संजय सिंह यांना जामीन देण्याचा निर्णय दिला. याप्रकरणी ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव आल्यानंतर मे 2023 मध्ये संजय सिंह यांनी दावा केला होता की ईडीने चुकून आपले नाव जोडले होते.

186
Sanjay Singh : आप नेते संजय सिंह यांना अखेर जामीन मंजूर
Sanjay Singh : आप नेते संजय सिंह यांना अखेर जामीन मंजूर

आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party, आप) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना मंगळवार, 2 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. दिल्ली मद्य धोरण (Delhi Liquor Policy) प्रकरणाशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या 6 महिन्यांपासून ते तुरुंगात होते.

(हेही वाचा – Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल)

ईडीचा जामीनाला आक्षेप नाही

याप्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंमलबजावणी संचालनालयाला (Enforcement Directorate, ईडी) विचारले की, संजय सिंह यांना अजून तुरुंगात ठेवण्याची गरज आहे का..? ईडीने न्यायालयाला सांगितले की, आमचा कोणताही आक्षेप नाही. त्यानंतर न्यायालयाने संजय सिंह यांना जामीन देण्याचा निर्णय दिला. याप्रकरणी ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव आल्यानंतर मे 2023 मध्ये संजय सिंह यांनी दावा केला होता की ईडीने चुकून आपले नाव जोडले होते.

गेले 6 महिने जेलमध्ये

ईडीने उत्तर दिले की, आमच्या चार्जशीटमध्ये 4 ठिकाणी संजय सिंह यांचे नाव लिहिले आहे. यापैकी 3 ठिकाणी नावाचे स्पेलिंग बरोबर आहे. फक्त एकाच ठिकाणी टायपिंगची चूक झाली. त्यानंतर ईडीने संजय सिंह यांना मीडियामध्ये वक्तव्य करू नका, कारण हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असा सल्ला दिला होता. त्यानंतर खा. सिंह (Sanjay Singh) यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून गेले 6 महिने ते जेलमध्ये होते. दरम्यान आता जामीन मिळाल्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.