राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरु असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. या सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाचे वकिल कपिल सिबब्ल यांनी मोठा युक्तिवाद केला आहे. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्र राज्यातील मविआ सरकार पाडण्यात आले, असे सिब्बल सुनावणीदरम्यान म्हणाले.
( हेही वाचा: SC Hearing: आमदारांना 5 वर्षांचा अधिकार, अध्यक्ष तो अधिकार काढून घेऊ शकत नाहीत; शिंदे गटाचा युक्तिवाद )
सिब्बल यांचा युक्तिवाद
- गुवाहाटीत बसून महाराष्ट्र सरकारसंदर्भात निर्णय होऊ शकत नाही.
- आमदार विलिन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. राजस्थानच्या केसचा दाखला यावेळी सिब्बल यांनी दिला.
- सुनिल प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचे आमदारांकडून उल्लंघन, त्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केले, सिब्बल यांचा युक्तिवाद.
- दहाव्या सूचीत बहुमताला महत्त्व असा काही नियम नाही, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद
- शिंदे गटाचे आमदार 34 असले, तरी त्यांच्यासमोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. सिब्बल यांचा दावा
- महाराष्ट्र केसचा परिणाम भविष्यावर होणार, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद
- सरकार आणि विरोधकांमध्ये बुद्धिबळाचा खेळ सुरु होता. दोघांनाही एकमेकांच्या चाली माहिती होत्या, न्यायालयाची मिश्किल टिप्पणी