नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण कायम

112

प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबत कथित वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या अटकेचे आदेश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीस नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नुपूर शर्मांना दिलासा मिळाला आहे.

नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही सूचना केली आहे. यावेळी न्यायालयाने सांगितले की, अशी याचिका करताना सरळ वाटते, पण याचे दूरगामी परगामी परिणाम होतात. आमचा सल्ला आहे की, ही याचिका मागे घ्यावी.

(हेही वाचा – महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरे म्हणाले “एक युग होतं, ते संपलं. आता…”)

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत डॉ. तस्लिम रहमानी यांनी वारंवार चिथावणी दिल्यामुळे संतप्त झालेल्या नुपूर शर्मा यांनी रागाच्या भरात प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर नुपूरच्या वक्तव्यावरून देशातील काही राज्यांमध्ये सुनियोजित हिंसाचार करण्यात आला.

देशात आगडोंब उसळल्यानंतर भाजपने नुपूरच्या विधानाशी संबंध नसल्याचे सांगत त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर नुपूर शर्मांच्या या विधानामुळे देशभरात काही टार्गेट किलिंगच्याही घटना घडल्या. नुपूर शर्मांच्या पोस्टचे समर्थन करणाऱ्या हिंदूंच्या जिहादींकडून हत्या करण्यात आल्या. यामध्ये राजस्थानातील उदयपूर इथे कन्हैयालाल आणि महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या हत्यांमुळे खळबळ उडाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.