- प्रतिनिधी
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात निवडणूक आयोगाने निवडणुकीत उमेदवारांना विविध वस्तूंवर जास्तीत जास्त किती खर्च करता येईल याचे दरपत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोग बाजारातील विक्रेते, राजकीय पक्ष आणि विविध घटकांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे वस्तुनिहाय दर निश्चित करतो. बहुतेक मतदारसंघांमध्ये किमतीच्या मर्यादा एकसारख्या असतात, तर काही वस्तूंच्या किमती स्थानिक बाजारभावानुसार ठरवल्या जातात. या व्यतिरिक्त, प्रत्येक विधानसभा उमेदवाराला निवडणूक आयोगाने ४० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा घातली आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Ashish Shelar यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, बाळासाहेबांना पुरात…)
यावेळी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि प्रचार सभांना उपस्थित राहणाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचे सविस्तर दरपत्रकही जाहीर केले आहे. यामध्ये दिल्लीतील लोकप्रिय पदार्थ, छोले-कुलचे आणि छोले भटुरे यांच्यासाठी अनुक्रमे ३५ आणि ४० रुपये दर निश्चित केला आहे. तर, समोसा, ब्रेड पकोडा, लाडू आणि गुलाब जामुनच्या प्रत्येक नगाची किंमत १२ रुपये ठरवण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक १०० मिली चहाचा दर ६ रुपये कॉफीची दर १२ रुपये ठरवला आहे. तसेच दुपार आणि रात्रीच्या जेवणाची किंमत ७० रुपयांपेक्षा जास्त असू नये असे निश्चित केले आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Gujarat मध्ये गोमांस तस्करांकडून गोरक्षकावर हल्ला; हुसेन, वसीमसह ५ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या)
पक्षाच्या निवडणूक कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेनांचा दरही प्रत्येक नगामागे ६ रुपये इतका आहे. पक्षाचे चिन्ह आणि उमेदवारांचे फोटो असलेले मनगट पट्टे आणि घड्याळे यांचा दर अनुक्रमे ४ रुपये आणि ३०८ रुपये इतका ठरवला आहे. प्रचार कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाद्यांमध्ये, ढोल वाजवणाऱ्याला दर दररोज ५०० रुपये हजेरी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, रोड शोसाठी प्राण्यांचा वापर करणाऱ्या उमेदवारांना, घोड्यासाठी जास्तीत जास्त ३,०७५ रुपये आणि हत्तीसाठी ६,१५० रुपयेच देता येणार आहेत. असे असले तरी यासाठी उमेदवारांना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community