MNS कडून विधानसभांच्या जागांची चाचपणी; मुंबईसह राज्यातील ३५ संभाव्य उमेदवारांची यादी तयार

182
MNS कडून विधानसभांच्या जागांची चाचपणी; मुंबईसह राज्यातील ३५ संभाव्य उमेदवारांची यादी तयार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे-मनसे अध्यक्ष राज ठाकर यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ही मनसे महायुतीसोबत दिसतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. सध्या मनसेला पुरक असलेल्या जागांची चाचपणी करत असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. आतापर्यंत ३५ जागांवर संभाव्य उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असून त्यात मुंबईतील ३६ जागांपैंकी १६ विधानसभा क्षेत्रांतील संभाव्य उमेदवारांची नावे समोर येत आहेत. (MNS)

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात ३६ विधानसभा मतदारसंघ असून यासर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर करणाऱ्या मनसेकडून आतापर्यंत १६ जागांवर संभाव्य उमेदवार ठरले आहेत. यात शिवडी विधानसभेतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माहिम-दादर विधानसभेतून नितीन सरदेसाई, तसेच उबाठाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभेत त्यांना टक्कर देण्यासाठी मनसेचे सरचिटणीस यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाणार आहे. मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना खेड-दापोली-मंडणगड विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (MNS)

(हेही वाचा – BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनवल्या कागदी पिशव्या)

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे, नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. ठाणे मतदार संघातून अविनाश जाधव यांची नावे पुढे येत आहेत. तर पुण्यात मनसेत दोन गट पडले आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. (MNS)

मुंबईतील १६ संभाव्य उमेदवार असे असतील

शिवडी – बाळा नांदगावकर
भायखळा – संजय नाईक
वरळी – संदीप देशपांडे
माहीम – नितीन सरदेसाई
चेंबूर – माऊली थोरवे (MNS)

घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
विक्रोळी – विश्वजित ढोलम/मनोज चव्हाण
मुलुंड – सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
भांडुप – शिरीष सावंत/अनिषा माजगांवकर
कलिना – संदीप हटगी/संजय तुर्डे
चांदिवली – महेंद्र भानुशाली
जोगेश्वरी – शालिनी ठाकरे
दिंडोशी – भास्कर परब
गोरेगाव – वीरेंद्र जाधव
वर्सोवा – संदेश देसाई
मागाठणे – नयन कदम (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.