- प्रतिनिधी
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने (BJP) उमेदवारांची छाननी सुरू केली आहे. पक्षाने अधिकाधिक नवे चेहरे मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली संघाच्या प्रत्येक पराभवानंतर रडायचा?)
दिल्लीत नववर्षातील फेब्रुवारीच्या मध्यात निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष सज्ज होत आहेत. दिल्लीतील सत्तारूढ आपने विधानसभेच्या सर्व ७० जागांवरील उमेदवार याआधीच जाहीर केले आहेत. काँग्रेसनेही २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, उमेदवार निवडीच्या आघाडीवर भाजपा (BJP) त्या पक्षांपेक्षा पिछाडीवर पडला आहे. अर्थात, भाजपाने (BJP) उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व उमेदवार निवडीसाठी अंतिम फेरीच्या बैठका घेईल. सध्या उमेदवारांच्या छाननीची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक जागेसाठी ३ संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Russia Kazan Drone Attack: रशियाच्या कझानमध्ये 9/11 सारखा हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
याआधी पराभूत झालेल्या अनुभवी नेत्यांचा उमेदवारीसाठी विचार होण्याची शक्यता कमी आहे. पक्षाची अधिक भिस्त नव्या चेहऱ्यांवर राहण्याची शक्यता आहे. चालू महिन्याच्या अखेरीस उमेदवार निश्चित होतील. त्यांची नावे जाहीर करण्याची प्रक्रियाही सुरू होईल, अशी माहिती भाजपाच्या (BJP) सुत्रांनी दिली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी आप आणि भाजपामध्ये होणार आहे. मात्र काँग्रेसही आपले उमेदवार देणार असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community