Maharashtra Politics : महाराष्ट्रात बदलणार खातेवाटपाचा फॉर्म्युला!

81
Maharashtra Politics : महाराष्ट्रात बदलणार खातेवाटपाचा फॉर्म्युला!
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी महायुतीला दोन तृतीयांश बहुमत आणि विक्रमी जागा मिळाल्यानंतर भाजपाला मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आणायचा आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागावर थेट परिणाम करणारे विभाग कोणत्याही किंमतीत स्वत:कडे ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. तर आपल्या सहकारी पक्षांमधील देखील वाचाळवीरांना मंत्रिमंडळातून दूर ठेवण्याचा नवा फॉर्म्युला आणला आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Cemetery : मालाडमधील प्राण्यांची दहनवाहिनी २ डिसेंबर २०२४ पासून तीन आठवडे बंद)

कोण आहेत हे वाचाळवीर ?

महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्य असल्याने सरकारमध्ये जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. त्यातच काही वाचाळवीर मंत्र्यांमुळे मागच्या सरकारला अडचणीत आणले होते. त्यातील पहिले नाव म्हणजे माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत. राज्याचे आरोग्य मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या मुजोर बोलण्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. तर कधी हाफकीनच्या विषयावर तर कधी आपल्याच कार्यालयातील वारंवार बदलत असलेल्या सचिव आणि स्वीय सहाय्यकांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मंत्री नेहमीच अडचणी आले होते. या क्रमवारीत दुसरे नाव म्हणजे अब्दुल सत्तार. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर आक्रमक शाब्दिक हल्ले करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर भाजपावर हल्लाबोल केला होता. हा हल्लाबोल भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये राहून अशा प्रकारची भाषा करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात भाजपाकडून कठोर भूमिका घेतली जात आहे. (Maharashtra Politics)

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यंग ब्रिगेड दिसण्याची शक्यता आहे. मात्र या नव्या मंत्रिमंडळात कोणाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे ? हे येणाऱ्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.