मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने ‘इंडि’ आघाडीतील (I.N.D.I. Alliance) पक्षांना सोबत घेतले नाही. अखिलेश यादव यांच्या सपाची काही ठिकाणी ताकद होती, तरीही त्यांना काँग्रेसने भाव दिला नव्हता. यामुळे या अनुभवावरून अखिलेश यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. काँग्रेसने आघाडीची ६ डिसेंबरला बैठक बोलावली होती, त्यावरून अखिलेश यांनी आधी जागावाटप नंतर पुढची चर्चा अशी अटच घातल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात
काँग्रेस स्थानिक पक्षांना भाव देत नसल्याने व पाच राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने ‘इंडि’ आघाडीतील (I.N.D.I. Alliance) पक्षांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. अखिलेश यांनी आधी जागा वाटप करावे, त्याशिवाय पुढे चर्चा करणार नसल्याची अटच घातली आहे. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, त्या पक्षाचा उमेदवार द्यावा असे ‘इंडि’ आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) बैठकीत सुरुवातीला ठरले होते. यावर आघाडीला पुढे जावे लागेल असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा Mosque : मशिदीवरील भोंग्याचा आवाज वाढल्यामुळे मौलवीविरोधात गुन्हा दाखल )
Join Our WhatsApp Community