…म्हणून राज ठाकरेंनी घेतला आगामी दिवसांतील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय!

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या उंबरठ्यावर कोरोना दाखल झाला असल्याची माहिती मिळतेय. यासह राज ठाकरेंचे शिवतीर्थ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे.

राज ठाकरेंच्या पुढील काही दिवसांच्या भेटी रद्द

या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून येत्या दहा दिवसातील सर्व कार्यक्रम, मीटिंग रद्द केले आहेत, अशी माहिती आहे. शिवतीर्थावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा –अरे वा! महाराष्ट्रातून ३.१० लाख टन नाशवंत माल तात्काळ पोहोचला देशभरात)

सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला लागण

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्वरीत इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल आज किंवा उद्या सकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे. सुरक्षा ताफ्यातील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here