पीएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल, फडणवीसांनी दिले आदेश

75

पीएफआय या दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या संस्थेच्या विविध ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयए आणि ईडीने देशभरातील या संस्थेशी संबंधित शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी करत शेकडो लोकांना ताब्यात घेतला आहे. या कारवाईचा निषेध म्हणून पुण्यात काही समाजकंटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा शनिवारी दिल्या. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणी पोलिस पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम 153, 124,109,120बी या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचाः पीएफआयवर लवकरच येणार बंदी, केंद्र सरकारकडून हालचाली सुरू)

काय आहे प्रकरण?

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी तसेच दहशतवाद्यांना आर्थिक मदत करुन दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी एनआयएने देशभरातील 15 राज्यांत पीएफआयच्या प्रमुख ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये महाराष्ट्रातही जवळपास 20 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्र एटीएस आणि एनआयए यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईचा निषेध म्हणून पीएफआयचे मुख्य कार्यालय असलेल्या पुणे जिल्ह्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान याबाबत पोलिसांनी आधी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आता देशद्रोहाचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.