नागपूर हिंसाचारात Faheem Khan सह ६ आरोंपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

48
नागपूर हिंसाचारात Faheem Khan सह ६ आरोंपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचारात Faheem Khan सह ६ आरोंपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपुरात (Nagpur) पुन्हा हिंसा भडकावी यासाठी अत्यंत घातक, प्रक्षोभक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी नागपूर दंगलीचा मास्टर माईंड फहीम खान (Faheem Khan) याच्यासह 6 जणांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सायबर सेलचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी (Lohit Matani) यांनी दि. २० मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली.

( हेही वाचा : Mumbai University : गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचे वार्षिक पुरस्कार घोषित

फहीम खानसह (Faheem Khan) अनेक आरोपींनी “गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा’, “मियाँभाई’, “अल्ला हो अकबर’ अशा हिंसा भडकावणाऱ्या आणि लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करणाऱ्या कॉमेंटस लिहून दंगलीचे व्हिडीओ व्हायरल केले. सोमवार 17 मार्चपासून आतापर्यत फेसबुक, व्टिटर, यूट्यूबवरून सुमारे २३० पोस्ट आयडेंटीफाय केल्या आहे. यात काही व्हीडीओही आहे. यापैकी 50 आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून एकुण 4 एफआयआर दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली. (Nagpur violence)

दंगलीनंतर फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवरून दोन्ही बाजूने प्रसारित करण्यात आलेल्या 50 टक्के पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहे. तर व्हॉटसऍप व गुगलला पोस्ट आणि व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे. यात अजूनतरी बांगलादेश वा बाहेरील देशातून विघातक पोस्ट लिहिण्यात आल्या असे निश्चित सांगता येत नाही. कारण प्रोफाईलमध्ये एखाद्याने एखाद्या देशाचे नाव लिहिले म्हणून संबंधित लगेच त्या देशाचा नागरिक होत नाही. हा तपासाचा भाग आहे असे मतानी यांनी सांगितले. (Nagpur violence)

फहीम खानने (Faheem Khan) त्याचा मोबाईल गणेशपेठ पोलिसांना दिला आहे. आम्ही त्याचा मोबाईल ताब्यात घेवून तपासू. तसेच चौकशीसाठी प्रॉडक्शन वॉरंटर ताब्यात घेवू असे मतानी म्हणाले.पोलिसांनी दंगल प्रकरणी 4 एफआयआर दाखल केले आहे. यात फहीम आणि त्याचे साथीदार येतात. भारतीय न्याय संहितेच्या कलम 192, 196, 353 1 (ब), 353 1 (क) कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. (Nagpur violence)

सहा ठिकाणी कर्फ्यूत अंशत: सवलत

दंगलीनंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपील नगर या 11 पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात कर्फ्यु लागु केला होता. संचारबंदीचा आढावा घेतल्या नंतर पोलिस आयुक्तांनी नंदनवन व कपील नगर पोलिस ठाण्याअंतर्गत कर्फ्यू पूर्णपणे उठवला. तर लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, इमामवाडा तसेच यशोधरा नगर ठाणे क्षेत्रातील कर्फ्यूमध्ये दुपारी 2 ते 4 या वेळेत ढील देण्यात आली. या नंतर कर्फ्यू पूर्ववत सुरू राहिल. तसेच कोतवाली, गणेशपेठ (Ganesh Peth), तहसीलमधील कर्फ्यू पुढील आदेशापर्यत कायम आहे. (Nagpur violence)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.