-
वंदना बर्वे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचाराच्या दलदलीत आकंठ बुडालेला चेहरा बघून आम आदमी पक्षाच्या सातही खासदारांनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून स्वत:ला लांब ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांत आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार आहे. तसं बघितलं तर, या दोन्ही राज्यात लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार आहे. असं असलं तरी, आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सातही खासदार कुठेच दिसून येत नाही. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (AAP)
भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी या मुद्यावरून अरविंद केजरीवाल यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, यापूर्वी लोकसभेचा एक खासदार केजरीवाल यांना सोडून गेला होता. मात्र, आता असे दिसून येत आहे की आपचे राज्यसभा खासदारही त्यांच्यासोबत राहिले नाहीत. (AAP)
सचदेवा म्हणाले की, आम आदमी पार्टीचे दिल्ली आणि पंजाबचे मिळून राज्यसभेचे १० खासदार आहेत. यातील फक्त तीन खासदार त्यांच्यासोबत दिसून येत आहेत. बाकीचे सात कुठे गायब झालेत? हे कोणालाच माहीत नाही. महत्त्वाचे म्हणजे, एक-दोन खासदार सोडले, तर आपचा खासदार कोण? हेही लोकांना माहीत नाही, असा टोमणा सचदेवा यांनी मारला आहे. केवळ केजरीवालच नाही, तर त्यांच्या खासदारांवरही टीका करताना सचदेवा म्हणाले की, त्यांचे दोन खासदार परदेशात आहेत आणि बाकीचे भारतात आहेत; पण तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांच्या पाठीशी कोणीही उभे नाही. (AAP)
जे सात खासदार बेपत्ता असल्याची चर्चा अख्ख्या दिल्लीत रंगली आहे, त्यातील चार खासदारांनी शुक्रवारी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली होती. या वेळी त्यांनी एकजुटीने राहण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र हे खासदार आजवर कुठे गायब होते?, असा प्रश्न निर्माण झाला. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना अटक केल्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने देशभरात उपोषण केले होते. मात्र या वेळेसही सर्व जण बेपत्ता होते. (AAP)
दिल्लीच्या रामलीला मैदानात महाविकास आघाडीने मोठी रॅली आयोजित केली होती. इंडी आघाडीचे सर्व नेते या वेळी उपस्थित होते. काँग्रेसचे सर्व नेते मंचावर उपस्थित होते. मात्र या वेळेस केजरीवाल यांचे केवळ दोन राज्यसभा खासदार मैदानात उपस्थित होते. (AAP)
सध्या खासदार संजय सिंह तुरुंगातून बाहेर आले आहेत. यामुळे ते राजकारणात सक्रीय दिसून येत आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे, आम आदमी पक्षाने (AAP) ज्यांना राज्यसभेचे खासदार बनवले, ते सर्वजण आपापल्या खासगी कामात व्यस्त आहेत. मात्र, केजरीवाल यांचे राज्यसभेतील खासदार बेपत्ता असल्याचा मुद्दा रंगू लागल्यामुळे चार खासदार अचानक प्रगट झाले आणि सुनीता केजरीवाल यांना भेटायला गेले, असा टोलाही भाजपाने लगावला. (AAP)
विरेंद्र सचदेवा म्हणाले की, मुळात राज्यसभेचे खासदार गायब नाही आहेत. तर, केजरीवाल यांच्या भोंगळ कारभारामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे आणि आता त्यांना केजरीवाल यांच्यासोबत कोणताही संबध ठेवायचा नाही. या खासदारांची आत्मा दु:खी झाली आहे. पण पक्षाचा दबाव आहे. अशात, भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे रहायचे? की केजरीवाल यांच्यासोबत रहायचे? हा प्रश्न त्यांना पडला आहे, असा टोला सुध्दा त्यांनी मारला आहे. (AAP)
(हेही वाचा – Piyush Goyal : भाजपाच्या संकल्प पत्रामधून विकसित, समृद्ध भारताची हमी)
कोण आहेत राज्यसभा खासदार…
दिल्लीतील तीन राज्यसभा खासदार संजय सिंह, स्वाती मालीवाल आणि एनडी गुप्ता आहेत. तर पंजाबमधून राघव चढ्ढा, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, संजीव अरोरा, दलवीर सिंग सिचवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी यांचा समावेश आहे. भाजपचे म्हणणे आहे की, संजय सिंह, संदीप पाठक आणि एनडी गुप्ता यांच्याशिवाय एकही राज्यसभा खासदार केजरीवाल यांच्यासोबत उभा दिसत नाही. (AAP)
अशातच केजरीवाल यांच्या सुटकेसाठी राज्यसभेचे खासदार केजरीवाल यांच्यासोबत दिसत नसल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये दिसू लागली. यात राघव चड्डा डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी लंडनमध्ये गेले आहेत. स्वाती मालीवाल यांच्या बहिणीची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्याकडे अमेरिकेला गेले आहेत. याक्षणी माझ्या बहिणीला माझी गरज आहे, असे मालिवाल यांचे म्हणणे आहे. (AAP)
खरं सांगायचं झालं तर, राज्यसभेच्या खासदार होण्यापूर्वी त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्या वेळी त्या इतक्या सक्रिय होत्या की, मुख्यमंत्र्यांनंतर कोणी सर्वात सक्रिय नेता असेल तर त्याच आहेत असे वाटायचे. पण केजरीवाल यांच्यावर अटकेची कुऱ्हाड कोसळताच त्या अमेरिकेला गेल्या. प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि कुलपती अशोक मित्तल, क्रिकेटपटू हरभजन सिंग, बिझनेस टायकून विक्रमजीत सिंग साहनी आणि पर्यावरण कार्यकर्ते दलवीर सिंग सिचेवाल हे सुध्दा बेपत्ता आहेत. (AAP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community